महिलांना छेडणाऱ्यांची आता खैर नाही; महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महिलांना छेडणाऱ्यांची आता खैर नाही; महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली

   पुणे , (प्रबोधन न्यूज )  -    पुण्यात मागील काही दिवसांपासून  महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच प्रमाण  वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुणे  पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार  यांनी रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या नोकरदार  महिलांची, विशेषतः आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विशेष सुरक्षा मोहीम सुरु केली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग असेल.

पोलीस आयुक्त कुमार यांनी सांगितले की, "संपूर्ण शहरात रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. वानवडी परिसरात एका ऑटोरिक्षा चालकाने एका तरुण संगणक अभियंत्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेला प्रतिसाद म्हणून हा  निर्णय घेण्यात आला आहे. महिलेने तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला, त्यामुळे वानवडी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली.

या घटनेमुळे रात्रीच्या वेळी आयटी कंपन्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली असून, आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेण्यास प्रवृत्त केले आहे. त्यांनी गुन्हे शाखा आणि वाहतूक पोलिसांसह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 मोहिमेत खालील उपाययोजनांचा समावेश असेल-

-शहरभर पोलीस दलाने रात्रीची गस्त वाढवली.
-आयटी कंपन्यांमध्ये सुरक्षा जागरुकता उपक्रम आयोजित करणे.
-रिक्षाचालकांचे परवाने तपासणे, तसेच उबेर आणि ओला सारख्या प्लॅटफॉर्मवरुन खाजगी वाहने आणि चालकांची छाननी करणे.
-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे.
-शहराबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करुन लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक आणि रेल्वे-स्थानकांच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
-उशिरापर्यंत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर आणि गुन्हेगारी नोंदी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

  1091 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा...

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही संकटात असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी असलेल्या 1091 या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 112, आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.