राज ठाकरेंना तुरूंगात टाका – अबू आझमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज ठाकरेंना तुरूंगात टाका – अबू आझमी

शिवसेना कार्यकर्त्यांचीही शरद पवारांकडे केली तक्रार

मुंबई, दि. 8 एप्रिल -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. तर अबू आझमी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाला त्रास देण्याचे काहींकडून प्रयत्न चालवले जात असल्याची तक्रार केली आहे.

या वेळी अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरे सारख्या नेत्याची काही औकात नाही. ज्यांचे आमदार नाहीत, ते मनाला वाटेल ते बोलतात. राज ठाकरे यांना अटक करून तुरूंगात टाकावे अशी मी शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. या देशात प्रत्येक हिंदूला मंदिरात प्रार्थना करण्याचे आणि मुसलमान व्यक्तीला मशिदींमध्ये नमाज पठण करण्याचे स्वातंत्र्य असतानाही राज ठाकरेंसारखे लोक उठसूट काहीही बोलत आहेत, अशी खंत अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे. लाऊडस्पीकरला राज्यात परवानगी आहे. मशिदीमध्ये फक्त 2 मिनिटे अजान होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्या सभेत जे काही बोलले. त्यावर करवाई व्हावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 अबू आझमी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे. पंरतू राज्यात काही असे लोक आहेत ज्यांची औकात नाही आणि ते मुस्लिम धर्माला त्रास देत आहेत. सानपाडा येथे शिवसेनेचे लोक मशीद बांधण्यामध्ये आक्षेप घेत आहेत. या मुस्लिम बांधवाना सुरक्षा दिली पाहिजे. राज्यात सेक्युलर सरकार असूनही शिवसेनेचे कार्यकर्ते असा प्रकार करीत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मशिदींवरील भोग्यांबाबत केलेल्या विधानानंतर राजकारण अधिकच चिघळत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे मनसेचे मुस्लिम पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या या विधानाने दुखावले असून एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मोरेंना शहराध्यक्षपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. अद्यापर्यंत तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसे शाखाअध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.