अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहर महिला काँग्रेसने केले लाक्षणिक उपोषण
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 24 मार्च – शहरवासियांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याला तोंड द्यावे लागत आहे, वारंवार तक्रारी करूनही दाद मिळत नाही. म्हणून त्या विरुद्ध गुरुवारी शहर महिला काँग्रेसच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पिंपरी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. अपुरा पाणीपुरवठ्यासंबंधी महानगरपालिकेतील संबंधित यंत्रणांना वारंवार तक्रार अर्ज, आंदोलन करूनही त्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली असे पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी या वेळी सांगितले.
सायली नढे पुढे म्हणाल्या की, आता शहरभर पाणी समस्येने उग्ररुप धारण केले आहे. यावर प्रशासक या नात्यानं आयुक्त राजेश पाटील यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा. स्वच्छ, मुबलक पाणी मिळावे अन्यथा पुढील महिन्यात पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला. वास्तविक मागील दोन वर्ष पवना धरण शंभर टक्के भरले होते. अद्यापही धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. तरी देखील प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे.
माजी नगरसेविका निर्मला कदम यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराला रोज ६०० एमएलडी पाणी लागते. यापैकी ३० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून दिले जाते. उर्वरीत पाणी पवना धरणातून घेतले जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांसाठी २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहीनी प्रकल्प, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना आणि आंद्रा धरणातूनही पाणी घेऊन शहरातील नागरीकांना देणार होते. मागील पाच वर्षात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प जैसे थे आहे. भामा - आसखेड - आंद्रा पाणी पुरवठा योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च करुन अद्यापही प्रकल्प पुर्ण झालेले नाहीत याचाही महिला कॉंग्रेस निषेध करीत आहे.
यावेळी माजी नगरसेविका निर्मला सद्गुरु कदम, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, डॉ. मनिषा गरुड, छायाताई देसले, निर्मला खैरे, शिल्पा गायकवाड, सुप्रिया पोहरे, आशा भोसले, प्रियांका मलशेट्टी, आशा काळे, अनिता अधिकारी, लता फर्नांडिस, सीमा हलकट्टी, वैशाली शिंदे, सोनु दमवाणी, अनिता ओव्हाळ, स्वाती शिंदे, पुष्पा गाडे, चतुरा धेंडे, व्दारका गाडे, रुद्रावणी आव्हाड, सुजाता धेंडे, रजीया शेख, द्रौपदी लोखंडे, राणी चंदनशिवे, वंदना चंदनशिवे, दिव्या चंदनशिवे, तेजश्री चंदनशिवे, रेणूका मुखटे, संगीता यादव, रजिया मुजावर, सोनाली गायकवाड, नंदनी विश्वकर्मा, सुमन विश्वकर्मा, चंदन ओव्हाळ, सुमन साळवे, जयश्री सगर, सुमन नाईक, शिला मायकल, मारीया मायकल, अनिता शहाणे, अमृता पारवे, जनाबाई मोरे, रंजना सदामती, आशा पारवे, शकुंतला हटकर, जनाबाई मोरे, सुमन नाईक, सुनिता वाघमारे, संगिता देडेकर, लक्ष्मणी खरकदारे, प्रतिक्षा खरकदारे, रुकसाना शेख, ऋतृजा उबाळे, तृप्ती जाधव, प्रियांका रॉय, अनिता साहनी, मंगल सरोट, शुशीला एकुरके, माया वाघ, अर्चना नहाणे, शोभा क्षिरसठ, शबनम शेख, आरती शुल्का, खुर्शिदा शेख, सादिया शेख आदींसह शहरातील विविध भागातून कॉंग्रेसच्या महिला भगिनी उपस्थित होत्या.