रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षांचे सत्कार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
चिंचवड, (प्रबोधन न्यूज) - रोटरी क्लब ऑफ़ चिंचवड पुणेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात २० माजी अध्यक्षांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, माजी प्रांतपाल दीपक गांगुली, डॉ दीपक शिकारपूर , रश्मी कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ़ चिंचवडच्या अध्यक्षा प्रा. शिल्पागैरी गणपुले, सचिव प्रसाद गणपुले आदी उपस्थित होते.
वेल्हे तालुक्यात पर्यावरणपूरक आणि कायम टिकणारा असा शाश्वत विकास घडवण्यासाठी काम करणाऱ्या ऱेनट्री फौंडेशनला सर्व्हिस एक्सलन्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम ५० हजार आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फौंडेशनच्या संस्थापक लीना दांडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला
यावेळी क्लबच्या माध्यमातून समाजसेवा करणारे सी.जे फ्रान्सिस, डॉ. आर. एन. नाईक, दिलीप चढ्ढा, सुरेंद्र शर्मा,नाना दामले,सीए.किशोर गुजर, सतीश आंबेकर,राजेश अग्रवाल, राजेंद्र पोफळे, प्रसाद गणपुले, गणेश कुदळे, संजय खानोलकर, डॉ.संजीव दात्ये, अरविंद गोडसे, प्रसाद शेठ, अनघा रत्नपारखी, मल्लिनाथ कलशेट्टी, बाळकृष्ण खंडागळे या माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेली २५ वर्षे रोटरीच्या माध्यमातून समाज कार्य करणारे जयप्रकाश राका, मनोहर दीक्षित सुभाष गावडे यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी अध्यक्ष डॉ.शिल्पागौरी गणपुले म्हणाल्या की, रौप्य वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या जागतिक शांतता परिषदेमध्ये रोटरीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शेखर मेहता यांच्यासह ३७ देशातील प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते. जलसंधारण, तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम असे अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र शर्मा व आभार महावीर सत्यान्ना यांनी मानले.