तेलुगु अभिनेत्री गायत्री ऊर्फ डॉली हिचे कार अपघातात निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तेलुगु अभिनेत्री गायत्री ऊर्फ डॉली हिचे कार अपघातात निधन

नवी दिल्ली, दि. २१ मार्च – तेलुगु अभिनेत्री व प्रसिद्ध मॉडेल गायत्री ऊर्फ डॉली हिचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याचं समजतंय. होळीच्या दिवशी एका कार्यक्रमावरुन घरी परताना तिच्या कारला अपघातात झाला. तो अपघात एवढा भीषण होता की, त्यातच तिचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिचं वय अवघं २६ वर्षे होते. तिची कार एका डिव्हायरडला जावून धडकली. या वेळी तिचा मित्र तिच्यासोबत प्रवास करीत होता. हा मित्र गंभीर जखमी झाला होता. त्यास त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्याचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला आहे.

आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं लाखो चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या  अभिनेत्रींमध्ये गाय़त्रीचं नाव घ्यावं लागेल. तिच्या निधनाचे वृत्त कळताच गायत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. टॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी देखील गायत्रीच्या कुटूंबियाप्रती सहानुभूती दर्शवली आहे.

टॉलीवूडमध्ये गायत्री ही डॉली डिक्रुझ या नावानं ओळखली जायची. तिचा कार अपघातात मृत्यु झाला आहे. गायत्रीच्या टीव्ही मनोरंजन प्रवासाविषयी सांगायचे झाल्यास, तिनं मॅडम सर मॅडम या तेलुगू वेबसीरिजमधून तिला अमाप लोकप्रियता मिळाली. गायत्रीचा फॅन फॉलोअर्सही मोठा होता. ती सोशल मीडियावरही सक्रिय असणारी अभिनेत्री होती. तिनं आपला युट्युब चॅनलमधून चाहत्यांची दाद मिळवली होती.

तिची सह अभिनेत्री मैत्रीण सुरेखा वाणीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, तिचं जाणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. एक मुलगी आपल्या आईला सोडून गेली आहे. माझ्यासाठी हे वेदनादायी आहे.