अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराडांकडून मोदींचं कौतुक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अर्थसंकल्पापूर्वी भागवत कराडांकडून मोदींचं कौतुक

नवी दिल्ली (प्रबोधन वृत्तसेवा) - केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा भारत 10 व्या क्रमांकावर होता, पण आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, अशा शब्दात भागवत कराडांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. भागवत कराड आज सकाळी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना कराड म्हणाले की, कोरोनानंतर देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. आर्थिक सर्वेक्षण पाहिला तर देशाचा आर्थिक विकास होत असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा भारत 10 व्या क्रमांकावर होता, पण आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. गेल्या आठ वर्षात भारताने 10 क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

भागवत कराड देखील सकाळी अर्थमंत्रालयात पोहचले आहेत. अर्थमंत्री सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील, त्यामुळे या भाषणाकडे सर्वांच लक्ष लागून आहे. दरम्यान मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार 2023-24 मध्ये जीडीपी विकास दर 6.5 टक्के असेल.