न्यूझीलंडमध्ये इच्छामरणाच्या कायद्याला मंजुरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

न्यूझीलंडमध्ये इच्छामरणाच्या कायद्याला मंजुरी

वेलिंग्टन -

न्यूझीलंडमध्ये अखेर इच्छामरणाचा कायदा लागू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्याबाबत न्यूझीलंडमध्ये चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीच याबाबत जनमत घेण्यात आले होते. यात बहुतांश नागरिकांना इच्छा मरणाच्या कायद्याच्या बाजूने मतदान केल्यामुळे हा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यूझीलंडमध्ये आता नागरिक इच्छामरणासाठी अर्ज करू शकणार आहेत. मात्र, यासाठी एक अट निश्चित करण्यात आली आहे.

ज्या व्यक्तीला दुर्धर असा आजार असेल आणि त्या आजाराने पुढील सहा महिन्यांत व्यक्तीचा मृत्यू निश्चित असेल, केवळ अशाच व्यक्तींना इच्छामरणाचा कायदा वापरता येईल. इतर कुणालाही हा कायदा वापरता येणार नाही. ज्या नागरिकांचा एखाद्या आजाराने मृत्यू अटळ आहे, त्यांना वेदना सहन करीत मृत्यूची प्रतीक्षा करण्याऐवजी शांततेने मृत्यूला सामोरे जाता यावे, यासाठी हा कायदा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. व्यक्तीला इच्छामरण देण्यापूर्वी ती व्यक्ती दुर्धर आजाराची ठरलेली अट पूर्ण करत असल्याबाबत दोन डॉक्टरांचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.