श्रीलंकेत कागद नाही म्हणून परीक्षा रद्द करण्याची वेळ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

श्रीलंकेत कागद नाही म्हणून परीक्षा रद्द करण्याची वेळ

श्रीलंका, दि. २१ मार्च – कागद नाही म्हणून परीक्षा रद्द करावी लागल्याचे तुम्ही कधी ऐकलयं ? पण असं घडलंय तेही आपल्या शेजारील श्रीलंका देशात. श्रीलंकेत सध्या कागदाचा तुटवडा आहे. एवढा तुटवडा आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या आहेत. श्रीलंकेला कागद इतर देशांमधून आयात करावा लागतो. मात्र डॉलरच्या कमतरतेमुळे तो आयात करता येत नाहीये. त्यामुळे एकच रस्ता उरला होता. तो म्हणजे परीक्षा रद्द करणे. शिक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे, की देशात सोमवारपासून शाळांमध्ये परीक्षा सुरु होणार होत्या. मात्र कागदाची कमतरता असल्याने अनिश्चित काळासाठी त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

श्रीलंकेत महागाई आणि आर्थिक संकटामुळे स्थिती चिंताजनक बनली आहे. एकीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, तर दुसरीकडे अत्यावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना पळापळ करावी लागत आहे. गेल्या एका वर्षापासून भीषण संकटांशी सामना करत असलेल्या श्रीलंकेत आता परिस्थिती बिघडत चालली आहे. रविवारी पेट्रोलसाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत.

या व्यतिरिक्त वीजपुरवठाही खंडित होत आहे. तासन् तास वीजपुरवठा खंडित असतो. अत्यावश्यक सेवांकरिताच वीजपुरवठा केला जातो. आगामी दिवसांत परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते. कारण देशातील एकमेव तेल शुद्धीकरण कारखान्याचे काम ठप्प झाले आहे. एवढेच नाही तर घरगुती गॅसचीही खूपच टंचाई आहे. १२ किलोच्या घरगुती गॅसच्या एक सिलिंडर श्रीलंकेत सध्या १ हजार ३५९ रुपयांपर्यंत मिळत आहे.