ओवेसी हल्ल्यातून वाचले, पण पत्नीच्या फायरिंगमधून सुटू शकले नाहीत ! वाचा मनोरंजक किस्सा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली-
एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासाठी गुरुवार हा दहशतीचा दिवस होता. मेरठहून दिल्लीला परतत असताना छिजारसी टोल प्लाझा येथे दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले, पण जेव्हा ओवेसी घरी पोहोचले तेव्हा ते त्यांच्या पत्नीच्या फायरिंगमध्ये बरोब्बर अडकले, त्यामुळे या हल्ल्यापासून वाचणे त्यांना कठीण झाले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षाचा प्रचार केल्यानंतर परतल्यानंतर ओवेसी आपल्या पत्नीला जेवायला घेऊन जातील असे वचन देऊन गुरुवारी घरी गेले होते. त्यामुळे गोळीबाराच्या घटनेनंतर ते घरी पोहोचले, तेव्हा पत्नी त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जाण्याच्या तयारीत होती.
घरी पोहोचल्यावर ओवेसी यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना सांगितली, मात्र पत्नीचा यावर विश्वास बसेना. त्यांना बाहेर घेऊन जाणे टाळण्यासाठी ते 'नवीन बहाणे' रचत असल्याचा आरोप त्यांच्या सौभाग्यवतीने केला. यावर ओवेसींनी पत्नीला टीव्ही चालू करून न्यूज चॅनल पाहण्यास सांगितले, इतक्यात त्यांच्या मुलीने आईला फोन केला. तिने वडिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत सांगितले तेव्हा कुठे मिसेस ओवेसींना खात्री पटली की ओवेसी खरोखरच सत्य बोलत आहेत, कोणतीही सबब पुढे करत नाहीयेत.
त्यावर ओवेसींना 'गोळीतून वाचलो, पण बायकोची वक्रदृष्टी टाळणे अवघड आहे' असे म्हणायचे होते असावे. दरम्यान हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारने ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते सुरक्षा घेण्यास नकार देत आहेत.