पुण्यातील शाळेत बाऊन्सरकडून पालकांना शिवीगाळ व मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यातील शाळेत बाऊन्सरकडून पालकांना शिवीगाळ व मारहाण

पुणे, दि. १२ मार्च - बिबवेवाडीतल्या क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांवर बाऊन्सर्सनी माराहण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  प्रकरणी मंगेश गायकवाड नावाच्या पालकानं तक्रार केल्यानंतर अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी फीसंदर्भात पालकांना बोलावले होते. त्यासाठी पालक शाळेत आले होते. मात्र पालकांचा बाऊन्सरशी वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय. शाळेसाठी बाऊंसर ही संकल्पनाच पूर्णपणे चुकीची असल्याचा सूरही काही पालकांनी आळवला आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत म्हणणे मांडण्यासाठी सगळे पालक शाळेत गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला बाऊन्सरनं मारहाण केली असल्याचं कळतंय.

पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणे दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली असता शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचं मंगेश  गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शाळेच्या आवारातच जर आपले म्हणणे मांडण्यासाठी गेलेल्या पालकांना अशाप्रकारे मारहाण होत असेल, तर हे खूपच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया अन्य पालकांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  भाजप जनता युवा मोर्चाची शाळेत घोषणाबाजी करण्यात आली आहे. शाळेच्या कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यानंतर शाळेत पोलीस आले आहेत.

मागील ३ वर्षांची फी पालकांनी भरलेली नाही. पालक गेल्या ३ वर्षांपासून त्रास देत असल्याचा आरोप देखील मुख्याध्यापकांनी के आहे. ७० टक्के पालकांनी अद्याप शाळेची फी भरलेली नाही, असा आरोप मेमोरिअल शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सिंह यांनी पालकांवर केलेला आहे. 

दरम्यान, या प्रकरणाची दखल शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मुख्याध्यापकांवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. तसंच शाळेत बाऊंसरच्या वाढत्या ट्रेंडबद्दल मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे.