फडणवीस हाजीर हो SS.. सायबर सेलकडून फडणवीसांना समन्स
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. १२ मार्च - बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या ११ वाजता हजर होण्याची नोटीस पोलिसांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावली आहे. रश्मी ठाकरेंच्या पोलीस टॅपिंग प्रकरणात फडणवीस यांना माहिती कुठून मिळाली याची चौकशी सायबर सेल करणार आहे.
याबाबत फडणविसांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी घोटाळेबाज महाविकास आघाडीचा भांडाफोड केला म्हणून फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. ऑफिशयल सिक्रेट अॅक्ट मधली माहिती लिक कशी झाली? अशा प्रकारचा एफआयआर नोंदणविण्यात आला आहे. या एफआयआरच्या संदर्भात मला पोलिसांकडून उत्तर मागितलं गेलं. मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की मी याची माहिती आपल्याला देईन. खरंतर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून माझा विशेषाधिकार आहे. माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. ” असं फडणवीस यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, मला मुंबई पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 163 नुसार नोटीस पाठवली. त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार मला पोलिसांचे बोलावणे आले आहे. मी पोलिस ठाण्यात उद्या सकाळी 11 वाजता जाणार आहे व पोलिसांना सहकार्य करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
गत वर्षी मी गृहविभागातील महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी सांगितले होते. घोटाळ्याची माहिती मी दिल्लीत देशाच्या गृहसचिवांना सादर केली. त्याचे गांभिर्य ओळखून न्यायालयाने यासंबंधीची चौकशीचे आदेश सीबीआयला दिले. या सर्व घोटाळ्याच्या चौकशीत अनिल देशमुखांचीही चौकशी केली जात आहे.