रविवारी राज ठाकरे यांची सभा गणेश कला क्रीडा मंच येथे होणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 20 मे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या रविवारी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे. या सभेचा टिझर आता मनसेकडून जाहीर करण्यात आलाय. हा टिझर पाहता मनसेची ही सभा वादळी ठरणार यात शंका नाही. औरंगाबाद येथील सभेतील, "सांगूनही समजत नसेल तर, एकदा काय ते होऊनच जाऊ दे" या राज ठाकरेंच्या ओळीने टिझरची सुरुवात होते. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांची पुण्यातील ही सभा वादळी ठरणार यात कुठलीही शंका नाही.
मागील दोन दिवसांपासून राज ठाकरे यांची पुण्यातील सभा होणार की नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून डेक्कन परिसरातील भिडे पुलानजीक असणान्या नदीपात्रात आणि सप महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी परवानगी देखील मागितली होती. त्यातील नदीपात्रातील सभेसाठी परवानगी देखील देण्यात आली होती. मात्र खराब हवामानाचा अंदाज आणि पाऊस पडण्याची शक्यता यामुळे नदीपात्रातील सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे आहे.
राज ठाकरे पुण्यातील दोन दिवसीय दौरा संपवून नुकतेच मुंबईला परतले आणि त्यानंतर आज या सभेची घोषणा करण्यात आली. याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी अचानक केलेल्या या घोषणेमुळे मनसैनिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. तर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्या अपमानाबद्दल त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी करत ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे हा संपूर्ण दौरा बराच चर्चेत आला होता. पण असं असताना आता राज ठाकरे यांनी अचानक आपला हा दौरा स्थगित केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. पाहा त्यांचं नेमकं ट्विट काय आहे ते...
'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच...
रविवार दि. 22 मे, सकाळी 10 वा.
स्थळ: गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे'
असं ट्विट करुन त्यांनी आपला दौरा स्थगित झाल्याची माहिती मनसैनिकांना दिली आहे.
दरम्यान, तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेने केले आहे. राष्ट्रवादीने मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील या ट्विटमध्ये मेन्शन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ट्विटला मनसेकडून काय उत्तर देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, माहितीनुसार राज ठाकरे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे अयोध्या दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे.