अधिवेशनात झोपी गेलेल्या गिरीश महाजनांना जेव्हा आशिष शेलार कोपरा मारून उठवतात ..!

अधिवेशनात झोपी गेलेल्या गिरीश महाजनांना जेव्हा आशिष शेलार कोपरा मारून उठवतात ..!

भाजपच्या 'सुपर कॉमेडी शो'वर हास्याबरोबरच टिकेचाही वर्षाव

मुंबई  - मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.. नेहमीप्रमाणे भाजपची धडाडती तोफ देवेंद्र फडणवीस तावातावाने आपला विषय तारस्वरात मांडत आहेत.. आणि त्यांच्याच मागे माजी मंत्री गिरीश महाजन यांना इतकी गाढ झोप लागलेली दिसते कि उजव्या बाजूला त्यांचा तोलही जातो.. इतक्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या ऍड. आशिष शेलार यांना ही बाब लक्षात येते आणि ते कोपरा मारून महाजनांना उठवतात.. त्यानंतर एकदम हडबडून जागे झालेले महाजन काहीही न कळल्याने लगेच  हातवारे करत घोषणा देऊ लागतात..! अर्थसंकल्पीय अधिवेशनातील हा 'सुपर कॉमेडी शो' सध्या चांगलाच वायरल होतो आहे !   सोशल मीडियावर या व्हिडिओला ट्रोल केले जात असून त्यावर चांगलीच टीका केली जात आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होते. पाठीमागील खुर्चीवर बसलेले मंत्री गिरीश महाजन झोपा काढत होते हे त्यांच्या शेजारी बसलेले माजी मंत्री अशिष शेलार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोपऱ्याने ढोसून त्यांना जागे केले. त्यानंतर अचानक जग आलेले महाजन हातवारे करू लागल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. हा मजेदार व्हिडीओ पाहून लोकांची हसून हसून मुरकुंडी वळली तर काहींनी मात्र संतापही व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधीच झोपा काढत असतील तर काय होणार ? अशी जोरदार टीका सोशल मीडियावर होताना दिसत आहे.