वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न सुरू, पण ; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली. तरी मात्र जनतेचा पाठिंबा माझ्यासोबत आहे. त्यामुळे सतत विरोधक चितपट होत आहेत. राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोप्प आहे. पण मात्र जगात स्वतःची मुद्रा उमटणं फार कठीण आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विश्वनाथ आनंद यांनी एकाच वेळी 22 जणांना बुद्धिबळामध्ये काल मुकाबला केला. खरंतर त्यांनी राजकारणात यायला हवं होते. राजकारणात देखील एकाच वेळी कित्येक विरोधकांचा मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात काही हत्ती असतात. एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि विषेशत: ठाकरे गट त्यांच्यावर टीका करताना दिसतो. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले .
बुद्धीबळाचे अनेक चमत्कार पाहिले आहेत. बुद्धिबळाचा उगमच आपल्या भारतात झाला महाराष्ट्रात बुद्धिबळ खेळण्याची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सात ग्रँडमास्टर झाले, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
विश्वनाथ आनंद यांनी साध्य केलं. आम्ही जी क्रांती केली. आम्हाला राजकारणातलं ग्रँडमास्टर म्हणतात मात्र खरे ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद आमच्या देखील ठाण्यात ग्रँड मास्टर त्यांचं नाव धर्मवीर आनंद दिघे आहे, असंही सांगायलाही शिंदे विसरले नाहीत.
भारताचा सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी कोरम मॉलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त 22 कुशल बुद्धिबळपटूंसोबत एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. बुद्धिबळ प्रेमींसाठी बुद्धी आणि कौशल्याचा हा खेळ पाहणं म्हणजे पर्वमी होती. विश्वनाथन आनंद आणि कार्यक्रम रोटरी क्लब, ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अकॅडेमी यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं.