'में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं' शरद पवारांनी अटलजींच्या कवितेतून अजितदादांना सुनावलं

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं' शरद पवारांनी अटलजींच्या कवितेतून अजितदादांना सुनावलं

  मुंबई ,   (प्रबोधन न्यूज )  -  'ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्यावर आज आमच्या एका सहकार्याने अटलबिहारी वाजपेयींची एक ओळ ऐकवली, 'में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं' असं म्हणत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अजित पवार यांना फटकारून काढलं.

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन पवारांनी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिउत्तर दिले.

मला वयाबद्दल सल्ला दिला जा आहे. पण आताच्या मंत्र्यांमध्ये तटकरे आहे, भुजबळ आहे, अनेकांचं वय हे 70 च्या पुढे आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्यांच्याशी माझा संवाद यायचा, ते अधिक जोमाने काम करायचे ते मोरारजी देसाई होते, ते पंतप्रधान झाले त्यांचं वय 84 होतं, आणि ते दिवसाला किती तास काम करायचे, हे एकदा तपासून पाहा. वय असतं असं नाही, पण चांगली प्रकृती असेल तर वय कधी अडचण ठरत नाही. ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्यावर आज आमच्या एका सहकार्याने अटलबिहारी वाजपेयींची एक ओळ ऐकवली, 'में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं' असं म्हणत पवारांनी अजितदादांना सुनावलं.

'माझ्या वाचण्यात वेगळं आलं आहे, सुप्रिया सुळेंनी आपल्या कामाची सुरुवात भटक्या विमुक्त जातींसाठी केली. नंतरच्या काळात पक्षात त्या सक्रीय झाल्या. त्यावेळी लोकसभेत जाण्याची चर्चा झाली. बारामतीत निवडणूक लढवून त्या मोठ्या मतांनी विजयी झाल्यात. आजपर्यंत त्या अनेक वेळा निवडून आल्या आहेत त्यांची तिसरी टर्म आहे. या सगळ्या चर्चेत सत्तेत कोणतं स्थान मिळालं का याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत आलं तेव्हा सुर्यकांता पाटील यांना मंत्रिमंडळात घेतलं, सुप्रिया जेव्हा संसदेत होत्या, त्यांच्या कन्याला मंत्रिपद दिलं. तिथे सुप्रिया सुळे होत्या. 10 वर्ष पटेल यांना मंत्रिपद दिलं. प्रफुल्ल पटेल हे निवडणुकीत पराभूत झाले होते. तरी त्यांना राज्यसभेत घेतलं. त्यांना मंत्रिपद दिलं. उड्डाण मंत्रिपद दिलं. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थितीत केला असेल तर सुप्रिया सुळे 3 टर्म खासदार असताना सुद्धा त्यांना सत्तेत घेण्याची कोणतीच अडचण नव्हती. पक्षातून पटेल यांच्या बाजूने निर्णय दिला, सुर्यकांता पाटील यांना दिला. अनेक लोक म्हणायचे सुप्रिया सुळे यांच्यावर अन्याय केला, पण मी अनेक वेळा वस्तूस्थिती मांडली' असं म्हणत शरद पवारांनी पटेल यांना टोला लगावला.

अमोल कोल्हेंचं कौतुक

'असं आहे अमोल कोल्हे यांनी कलेच्या क्षेत्रात विशिष्टपणे काम केलं. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात वावरत होते. ते राष्ट्रवादीत आले त्यांनी काम केलं. याबद्दल मी त्यांना आग्रह केला होता. ज्या मतदारसंघातून ते प्रचंड मताने निवडून आले आहे. ते चांगल्या प्रकारे काम करत आहे' असं म्हणत पवारांनी कोल्हे यांचं कौतुक केलं.

'राष्ट्रवादीच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे, खरं म्हणजे, असं व्हायला नको. काही सहकार्यांनी निर्णय घेतला. आम्ही सगळ्यांनी काल जी निवडणूक लढवली एका विशिष्ट गटाला विरोध करण्यासाठी घेतली होती. सत्ता मिळाली नाही म्हणून काही सहकारी त्यांच्याकडे जात असतील तर त्यांना राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण त्यानंतर सोडून गेलेल्या पक्षाच्या साधन सामग्रीबद्दलचा निर्णय घेणे योग्य वाटत नाही. मला असं वाटत सद्धसद विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचा सल्ला देऊ' असंही पवार म्हणाले.

'मला साधारणपणे येताना लोकांचे चेहरे आणि त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर मी आत्मविश्वास वाढावा एवढी उत्तम भूमिका लोकांच्या मनात दिसून आली. त्यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांची विधानसभेत जाण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर मी सहकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा सहकाऱ्यांनी येवल्यातून निवडणूक लढवता येईल असं सुचवलं. आम्हा लोकांच्या चर्चेनंतर येवला मतदारसंघाबद्दल ठरलं. 1986 साली त्यावेळी मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, वेगळा पक्ष आम्ही स्थापन केला, सर्व जागा आम्हाला व्यवस्थितीत करून दिल्या. येवल्यातून 2 जण निवडून आले होते. त्यामुळे आम्हा लोकांच्या विचाराचा कोणता, भुजबळांना सेम जागा द्यायची होती, तेव्हा सगळ्यांची सहमती घेतली, त्यानंतर उमेदवारी दिली होती' असं म्हणत भुजबळांना येवल्यात कशी उमेदवारी दिली होती, याबद्दल पवारांनी स्पष्ट मत व्यक्त केलं.