रशियाने केली तात्पुरती युद्धबंदी; अडकलेल्या भारतीयांना दिलासा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रशियाने केली तात्पुरती युद्धबंदी; अडकलेल्या भारतीयांना दिलासा

नवी दिल्ली, दि. 5 मार्च – गेल्या नऊ दिवसांपासून रशियाने युक्रेनवर चौफर हल्ला चढविला आहे. यात युक्रेनची प्रचंड हानी झाली आहे. सामान्य नागरिक जीवनावश्यक न मिळाल्याने हवालदिल झाले आहेत. शेकडो सैनिक, नागरिक एक तर मृत्युमुखी पडले आहेत किंवा जखमी तरी झाले आहेत. 18 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 11 हजारजण भारतात परतले आहेत. अजूनही जवळपास सात हजार विद्यार्थी/नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. रशियाने युद्ध थांबवल्याने या भारतीयांचा आता परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, रशियाने नागरिकांची ससेहोलपट पाहून तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली आहे.  युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये वाटाघाटींसाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर आता रशियाच्या बाजूने यासंदर्भात मोठा निर्णय आला आहे. रशियाच्या सरकारने तात्पुरता शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केलंय.

युद्धविरामची रशियाने जरी घोषणा केली असली तरी रशिया सैन्य माघार घेणार नसल्याचे समजते आहे. युक्रेन मधील नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे.