मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले कुटुंबासह मतदान

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले कुटुंबासह मतदान

       नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज )   -   आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. लोकसभा २०२४ साठी दिल्लीतील सातही जागांवर आज मतदान पार पडत आहे.

दरम्यान, दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांसाठी आज मतदान होत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

यानंतर त्यांनी माध्यमांशी खास बातचीत केली. ते म्हणाले की, सध्या तापमान जास्त प्रमाणात आहे. पण नागरिकांनी काळजी घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवला पाहिजे. असे माझे सर्वांना आवाहन आहे. जनतेने आज हुकूमशाही, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मतदान केले पाहिजे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.