गेल्या 24 तासांत 4000 हून अधिक नागरिक युक्रेनहून परतले, आतापर्यंत 11 हजार नागरिक भारतात परतले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, दि. 5 मार्च - 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत आतापर्यंत 11,000 भारतीयांना सुरक्षित परत आणले आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली, तर गेल्या 24 तासांत 4 हजारहून अधिक नागरिक, विद्यार्थी यांना ऑपरेशन गंगाद्वारे एअर इंडियाच्या विमानाने भारतात परतले असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाकियाच्या एअरफील्डमधून 629 भारतीय नागरिकांसह तीन IAF C-17 विमाने हिंडन एअरबेसवर परतली. तसेच या विमानांनी 16.5 टन मदत सामग्री बाधित देशांत पोहोचवण्यात आली आहे.
'ऑपरेशन गंगा' अंतर्गत आतापर्यंत 48 उड्डाणे भारतात पोहोचली आहेत, त्यापैकी 18 उड्डाणे गेल्या 24 तासांत पोहोचली आहेत. या 18 फ्लाइट्समधून परतलेल्या भारतीयांची संख्या सुमारे 4000 आहे. भारत युक्रेनच्या पश्चिम शेजारी जसे की रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि पोलंडमधून आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे बाहेर काढत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे 24 फेब्रुवारीपासून युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद आहे. अजूनही युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. बहुतेकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची अतिशय अबाळ होत आहे. भारताने त्यांना युक्रेनच्या सीमा पार करून शेजारील देशांत येण्यास सांगितले आहे. अनेकजण धाडस करून बंकरमधून गोळ्यांच्या वर्षावात स्वतःला वाचवत व भारतीय तिरंगा घेऊन इतर देशांकडे प्रयाण करीत आहेत.