पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी बबन झिंझुर्डे यांची निवड

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी बबन झिंझुर्डे यांची निवड

पिंपरी, दि. १ मार्च - पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांची निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता घोषित केले. या घोषणेनंतर कर्मचा-यांनी महापालिकेच्या बाहेर घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. 

पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) निवडणूक झाली होती. मतमोजणी झाल्यानंतर आपला महासंघ पॅनेलचे प्रमुख व अध्यक्षपदाचे उमेदवार अंबर चिंचवडे यांनी अध्यक्षपदाच्या मतांवर आक्षेप नोंदविला होता. यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करुन निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निकाल घोषित करताना सांगितले की, स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांना एकूण २५३४ मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना २५२५ मते मिळाली आहेत. सर्व पंचवीस जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना गुरुवारी ३ मार्च रोजी निवडणूक कार्यालयात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनेलचे १० पैकी ९ पदाधिकारी निवडून आले आहेत. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे २५ पैकी १९ उमेदवार निवडून आले.

सविस्तर निकाल पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना २६८२ महादेव बोत्रे  यांना २६०८, सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना २६८३ चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना २६१५, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना २६६५, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना २६४०, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना २७०२ मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना २६१५ मते मिळाली आहेत.