भाजपचे उमेदवार ठरले; कसबा – रासने तर चिंचवड – अश्विनी जगताप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपचे उमेदवार ठरले; कसबा – रासने तर चिंचवड – अश्विनी जगताप

पुणे (प्रबोधन न्यूज) – महाविकास आघाडीनंतर भाजपनेही आपले दोन्ही मतदारसंघातील उमेदवर जाहीर केले आहेत. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने तर चिंचवड मतदारसंघातून कै. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाले आहे. गेले अनेक दिवस या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता नागरिकांबरोबरच राजकीय कार्यकर्त्यांना लागून राहिली होती. आता चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बरोबर होणार आहे. धंगेकर हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांची लढत महाविकास आघाडीचे राहूल कलाटे यांच्या बरोबर होणार आहे.

कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक होते इच्छुक होते. मात्र अखेर हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मनसेही लढवणार कसबा विधानसभा निवडणूक

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या लढाईत उतरणार असून, मनसे आपला उमेदवार सोमवारी जाहीर करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासणार आहेत. सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे.