अमरावतीत चार दिवसांसाठी कर्फ्यू : पोलीस आयुक्त संदीप पाटील यांचे आदेश
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अमरावती -
महाराष्ट्रातील अमरावती शहरात हिंसाचारानंतर प्रशासनाने ४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे. अफवा पसरवण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली आहे. इंटरनेटवरील निर्बंध ३ दिवसांसाठी असणार आहेज. एकूणच अमरावतीत कर्फ्यू लागू झाल्यानं अनेक निर्बंध लागू करण्यात आलेत.
१२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी शहरात कलम १४४ लागू करत कर्फ्यूचे आदेश दिलेत. यानुसार आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घरााबाहेर पडता येणार नाही. ५ किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत. हे सर्व निर्बंध कर्फ्यूबाबतचा पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत.
त्रिपुरात अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हल्ल्यांविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबरला निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुस्लीम संघटनांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देत हे हल्ले रोखण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मोर्चातील लोक परत जात असतानाच अमरावतीतील चित्रा चौक, कॉटन बाजार परिसरात ३ ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.
या विरोधात भाजपाने १३ नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. मात्र, या बंदला हिंसक वळण लागलं. जमावाने अनेक दुकानांची तोडफोड करत मोठं नुकसान केलं. यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झालं. यामुळे अखेर अमरावती प्रशासनाने कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीसह नांदेड, मालेगाव, वाशिम आणि यवतमाळमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले. या प्रकरणात आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांना अटकही करण्यात आली आहे.