नील सोमय्यांना अटक होणार ? अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नील सोमय्यांना अटक होणार ? अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई, दि. 1 मार्च - भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी केलेला अटकपूर्व जामीन आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे नील सोमय्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध आहेत असा त्यांच्यावर शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी आरोप केला होता. 'बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे' असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते असा अंदाज आल्यानंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी अगोदरच न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्या गेल्या असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्यानंतर आता राज्य सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवली होती. याच प्रकरणात नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन ही कंपनी किरीट सोमय्या, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा नील यांची आहे. त्यांचा भागीदार पीएमसी बँक गैरव्यवहारातील आरोपी राकेश वाधवा आहे. पीएमसी गैरव्यवहारातील पैशाची गुंतवणूक त्याने केली. यातून वसई तालुक्यातील गोखीवरे येथे हजारो कोटींचा प्रकल्प उभारण्यात आला. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कोट्यवधीची जमीन घेतली. देवेंद्र लधाणी या फ्रंटमनच्या नावावर ही जमीन घेण्यात आली आणि पैसेही घेण्यात आली. चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटींना घेण्यात आली. एकूण दोन जमिनी घेण्यात आल्या. दुसरी जमीन सात कोटींनी घेण्यात आली.

या जमिनीवर जो प्रकल्प उभा आहे, त्या कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे. निकॉन फेज 1 फेज 2 हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. हा सगळा पैसा पीएमसी बँकेतील आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. हरित लवादाने यात लक्ष घातल्यास दोनशे कोटींचा दंड होऊ शकतो.