दिल्लीसमोर कदापिही झुकणार नाही - संजय राऊत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता आता.... राऊतांचा भाजपवर घणाघात
मुंबई, दि. 19 - शिवजयंतीच्या निमित्ताने संजय राऊतांनी केंद्र सरकारवर म्हणजेच भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. मुगलांच्या काळात दिल्लीवर क्रूरशासक औरंगजेबाची सत्ता होती. आज औरंगजेबाच्या जागी पंतप्रधान मोदी असल्य़ाची टीका मोदींचे नाव न घेता केली. शिवाजी महाराजांचं उदाहरण देताना आपण दिल्लीसमोर झुकणार नसल्याचं प्रतिपादन केलं आहे.
“छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, ती म्हणजे स्वाभिमान. मरण पत्करेन, पण शरण जाणार नाही हा जो बाणा शिवरायांचा आहे, तो महाराष्ट्रानं कायम जपला. आजही आम्ही दिल्लीसमोर ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत. दिल्लीपुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीनं कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्राने उसळून म्यानातून तलवार काढून लढा दिला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्र लढतोय.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आजही औरंगजेब, सूर्याजी पिसाळ, जयचंद आहेत. ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही प्रिय आहेत. ज्यांनी मुंबईतल्या शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध केला, असे लोक औरंगजेबाचे इथले हत्यार आहेत. हे महाराष्ट्रद्रोही. त्यांच्या पाठिशी इथले गद्दार आणि दिल्लीतं तख्त उभं आहे. आणि हे तख्त फोडण्याची ताकद महाराष्ट्रात आहे, अशी टीका त्यांनी किरीट सोमय्यांचे नाव न घेता केली.