राज्य चालवताना शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर - मुख्यमंत्री
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
किल्ले शिवनेरीवर उत्सावात शिवजयंती साजरी
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर शिवनेरीवर उपस्थित
मुंबई, दि. 19 - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, राज्य चालवताना आमच्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी राजे यांचा आदर्श असतो.
..... आणि अजितदादा संतापले
शिवनेरी किल्ले येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवभक्तांसमोर बोलताना एका पत्रकाराने त्यांना मराठा आरक्षणा संदर्भात छेडला असता दादांचा पारा अचानक चढला. त्यांना त्या पत्रकाराला चांगलेच खडसावले. आज शिवजयंती आहे ते ध्यानात न घेता तू कुणाची सुपारी घेऊन मला प्रश्न विचारतो आहेस असा सवाल त्यांनी केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही विधीमंडळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कारणाने न्यायालयाकडून ते आरक्षण फेटाळण्यात आलं. नंतर आयोग स्थापन करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. ५० टक्क्यांवर आरक्षण जाऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच यासंदर्भात कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे,” असं ते म्हणाले.
आम्ही पण मराठा समाजाचे आहोत, पण राज्याचे नेतृत्व करत असताना सगळा विचार करावा लागतो. असे असताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, विधिमंडळ एकमताने ते मंजूर केलं. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, कारण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, असंही त्यांनी म्हटलं. छत्रपतींनी अठरापगड जातींना सोबत घेऊन पुढे जायचं, हे शिकवलं,” असंही अजित पवार म्हणाले.