शेतीच्या वापरासाठी शेकडो ड्रोन तैनात; मोदींनी केले उद्घाटन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शेतीच्या वापरासाठी शेकडो ड्रोन तैनात;  मोदींनी केले उद्घाटन

नवी दिल्ली, दि. 19 - स्टार्टअपच्या माध्यमातून शेतीच्या वापरासाठी ड्रोन तयार करण्यात आले आहेत. या ड्रोनमधून पीक पेरणी, औषधांची फवारणी, खतांची फवारणी करता येणार आहे. त्यामुळे वेळ व श्रम दोन्ही वाचणार असल्याने, शेतकऱ्याच्या खर्चात बचत होणार असून, शेतकऱ्याचा नफा वाढण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतात कीटकनाशक फवारणीसाठी 100 किसान ड्रोनचे उद्घाटन केले.

या वेळी नरेंद्र मोदी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या स्टार्टअप्सना सरकारच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. भारत लवकरच या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येईल, असेही ते म्हणाले.

ड्रोन ही सैन्याशी संबंधित यंत्रणा आहे, असे वा़टायचे परंतु आता 21 व्या शतकात ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक कृषी व्यवस्थेच्या दिशेने एक नवीन अध्याय सुरू झाल्याचे मोदी म्हणाले. शेतकर्‍यांना मदत करण्याच्या विशेष मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागात १०० किसान ड्रोनला झेंडा दाखवला.