आत्याबाईला मिशा असत्या तर... अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आत्याबाईला मिशा असत्या तर... अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया

2004 मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवायला हवे होते

मुंबई (प्रबोधन न्यूज) - अजित पवारांना २०२४ मध्ये मुख्यमंत्रीपद आल्यास काय कराल? अशी विचारणा एका मुलाखतीत करण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. “आत्याबाईला मिशा असत्या तर छान झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे. झाल्यावर दाखवतो काय करायचंय ते”, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

या मुलाखतीमध्ये अजित पवारांना राजकीय जीवनात केलेल्या चुकांविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी एक मोठी चूक वाटत असल्याचं सांगितलं. “ते आता सांगण्यात अर्थ नाही. पण एक मोठी चूक वाटते की २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं. कुणालाही मुख्यमंत्री करायचं होतं. आर. आर. पाटील, छगन बुजबळ किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात जे होते त्या कुणालाही करायला हवं होतं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, २००४ मध्ये मुख्यंमत्रीपद सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमका कुणी घेतला? यासंदर्भातही अजित पवारांना यावेळी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यावर त्यांनी मिश्किल शैलीमध्ये उत्तर दिलं. “तेव्हा आम्ही क्लिअर होतो. पण त्यावेळी आमच्या निर्णय प्रक्रियेत बोलणारे कोण होते? आमचे सर्वोच्च नेते, प्रफुल्लभाई, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह पाटील हे आमचे नेते होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं असं होतं”, असं अजित पवारांनी यावेळी सांगत या चुकीसाठी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि पक्षातील त्या वेळच्या इतर वरीष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं आहे.