यलम्मा देवीला बकऱ्याऐवजी मिळाला माणसाचा बळी ! आंध्र प्रदेशमधील धक्कादायक घटना

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

यलम्मा देवीला बकऱ्याऐवजी मिळाला माणसाचा बळी ! आंध्र प्रदेशमधील धक्कादायक घटना

चित्तूर  -

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. दारुच्या नशेत येथे एका व्यक्तीने बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका व्यक्तीचाच बळी दिला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. 

मदनपल्ले गावामध्ये ही घटना १६ जानेवारी रोजी घडली. स्थानिक लोक मागील अनेक वर्षांपासून यल्लमा देवीच्या मंदिरामध्ये बकऱ्यांचा बळी देतात. यावेळेसही संक्रांतीच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये बकऱ्यांचा बळी देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाजूलाच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार चलपती नावाच्या एका व्यक्तीला मंदिरात बकऱ्याचा बळी द्यायचा होता. मात्र बकऱ्याचा बळी देण्यासाठी चलपति जेव्हा मंदिरात आला तेव्हा तो दारुच्या नशेत होता. पूजा झाल्यानंतर बळी देण्याची वेळ आली तेव्हा चलापतिने दारुच्या नशेत बकरा पकडून बसलेल्या सुरेश नावाच्या व्यक्तीचाच गळ्यावर तलवार ठेवली. इतरांनी चलपतिला रोखण्याआधीच त्याने सुरेशच्या मानेवरुन तलवार फिरवली होती.

काही क्षणांमध्ये मंदिरात बकरं कापण्याच्या जागी सुरेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मंदिरामधील इतरांनी तातडीने सुरेशला मदनपल्ले सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रतत्न सुरु केले. मात्र रुग्णालयामध्ये नेत असतानाच वाटेतच सुरेशचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सुरेशला मृतावस्थेतच रुग्णालयात आणल्याचं सांगितलं. चलापतिला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. हा सर्व प्रकार ऐकून पोलीसही गोंधळून गेल्याचं स्थानिक सांगतात.  या प्रकरणामध्ये दारुच्या नशेत असणाऱ्या चलापतिला स्थानिकांनी पकडून ठेवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस आता प्रत्यक्ष ही घटना पाहणारे साक्षीदार आणि इतर पुरावे गोळा करत आहेत.