UPSC निकालामध्ये या वर्षीही मुलींचाच डंका
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
एकूण 685 उमेदवारांची वर्णी
नवी दिल्ली, दि. 30 मे – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने UPSC नागरी सेवा परीक्षा, 2021 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या वर्षी UPSC द्वारे एकूण 685 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 244, EWS 73, OBC 203, SC 105 आणि ST प्रवर्गातील 60 उमेदवारांचा समावेश आहे.
याही वर्षी पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आली आहे. अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला व ऐश्वर्या वर्मा यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या चारही जागांवर मुलींनी मारलेली बाजी यंदाच्या निकालाचे खास वैशिष्ट्य आहे. परीक्षार्थींना आपला निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
टॉप टेन मधील उमेदवारांची नावे
१- श्रुती शर्मा
२- अंकित अग्रवाल
3- गामिनी सिंगल
4- ऐश्वर्या वर्मा
5- उत्कर्ष द्विवेदी
6- यक्ष चौधरी
7- सम्यक सा जैनी
8- इशिता राठी
९- प्रीतम कुमार
१०- हरकिरत सिंग रंधवा
आयोगाने 17 मार्च रोजी नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला होता. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. ही मुलाखत 5 एप्रिल ते 26 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. मुलाखत फेरीत उपस्थित राहण्यासाठी 1,800 हून अधिक उमेदवारांना निवडण्यात आले होते.