पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा संपन्न

खटकर, कलान (पंजाब), दि. १५ मार्च - पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आप नेते भगवंत मान विराजमान झाले. आपला बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी शहीद भगत सिंग यांच्या गावात शपथ घेतली. भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलानमध्ये मोठ्या थाटामाटात आणि शहीद भगतसिंग यांना स्मरण करत शपथविधी सोहळा पार पडला. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास 2 लाख लोकांनी हजेरी लावली होती. शहीद भगतसिंग स्मारकाच्या बाजूलाच 1 लाख लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांना शपधविधी सोहळ्याला उशीर झाला. १२.३० वाजता शपथविधीचा कार्यक्रम होता. पण भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ५० मिनिटं उशिराने शपथविधी सोहळ्याला पोहोचले. हवामान खराब असल्यामुळे मोहालीहून खटकड कला येथे ते वेळेवर पोहोचू शकले नाही, असे सांगण्यात येत आहे. राज्यपालही व्यासपीठावर पोहोचले होते. पण त्यांनाही वाट बघायला लागली. जवळपास दीड वाजता भगवंत यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

राज्यपाल बीएल पुरोहित यांनी मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मान यांनी पंजाबी भाषेत ईश्वराच्या साक्षीने शपथ घेतली. यानंतर त्यांनी भाषण करत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. भगवंत मान आता पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री बनले आहेत. फक्त काही तारखांनाच हुतात्म्यांचे स्मरण का केले जाते? त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण रोज चालले पाहिजे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा अहंकार करू नये. मला अशा बातम्या ऐकायला यायला नकोत, असे शपथ घेतल्यानंतर पंजाबचे नवे मुख्यमंत्री झालेले भगवंत मान म्हणाले.