भाजपला आणखी एक झटका ! आमदार अवतार सिंह भडाना यांचा रालोदमध्ये प्रवेश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपला आणखी एक झटका ! आमदार अवतार सिंह भडाना यांचा रालोदमध्ये प्रवेश

लखनौ - 

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठे धक्के बसत आहेत. भाजप आमदार अवतार सिंह भडाना यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला आहे. 

भडाना हे मेरठच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. रालोदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देताना, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते अवतार भडाना आज राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या उपस्थितीत रालोदमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांत भाजपला हा पाचवा मोठा धक्का बसला आहे.

अवतार सिंह भडाना यांनी बुधवारी राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांची भेट घेतली आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला. अवतार सिंह भडाना यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला वर्चस्व प्राप्त करुन देण्यात मोठी भूमिका बजावली होती. शेतकरी आंदोलनानंतर उत्तर प्रदेशच्या पश्मिम भागात भाजपला काहीसा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागातूनच उत्तर प्रदेशच्या सात टप्प्यातील मतदानाना सुरुवात होणार आहे. अशावेळी अवतार सिंह भडाना यांनी भाजपची साथ सोडणं पक्षाला मोठ्या अडचणीचं ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

24 तासात पाच बड्या नेत्यांची भाजपाला सोडचिट्ठी 
भाजपला मागील 24 तासात 5 बड्या नेत्यांनी मोठा झटका दिलाय. उत्तर प्रदेश सरकारमधील स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बांदाच्या तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बृजेश प्रजापती यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर शाहजहापूरच्या तिलहर मतदारसंघाचे आमदार रोशनलाल वर्मा यांनी भाजपची साथ सोडली. त्याचबरोबर कानपूरच्या बिल्हौरचे आमदार भगवती प्रसाद यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.