रुपीनगर तळवडे घटनास्थळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली भेट

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रुपीनगर तळवडे घटनास्थळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली भेट


 जखमींना देखील मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार.....मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,


  पिंपरी, (प्रबोधन न्यूज) -   रुपीनगर तळवडे परिसरात बर्थडे कँडल बनविण्याच्या कारखान्याला काल दिनांक ८ रोजी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती, या भीषण आगीत कारखान्यात काम करणाऱ्या ७ महिलांचा भाजल्यामुळे मृत्यू झाला असून, ९ महिलांवर ससून येथे उपचार सुरू आहेत, या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 


     शिरूर लोकसभेचे मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुपीनगर तळवडे घटनास्थळी भेट दिली, यावेळी घटनास्थळी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासन उपस्थित होते, आढळराव पाटील यांनी पालिका प्रशासन तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली.


    पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी असून, छोटे मोठे कारखाने इथे मोठ्या प्रमाणात आहेत, हातावर पोट भरणाऱ्या कामगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, अशा काही घटनांमुळे वित्तहानी बरोबर मनुष्य हानी देखील होते, पालिका प्रशासनाने अशा घटना भविष्यात होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी पालिका प्रशासनास केल्या. 


    रुपीनगर तळवडे मधील घटना गंभीर असून मुख्यमंत्री साहेबांनी मृतांच्या नातेवाईकाना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे, जखमी व्यक्तींना देखील मदत मिळावी या करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.


     यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, सुनील बाणखेले, भोसरी विधानसभा प्रमुख  प्रा. दत्तात्रय भालेराव, जिल्हा सल्लागार रविंद्र करंजखेले, पुणे जिल्हा शिवसेना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख सुनील पवार, उपशहर प्रमुख  बळीराम जाधव, विशाल लांडगे, संदीप जाधव, राहुल पिंगळॆ, साईनाथ ढाकणे, तसेच भोसरी मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.