आगामी निवडणूक एकत्रित लढविणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान, मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी, पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की ही पत्रकार परिषद महाराष्ट्र जनतेचा आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रात जनतेने घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळवून दिले. अनेक संघटनांनी छोट्या पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी मदत केल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष करून नमूद केले. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आम्हाला मत दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रचंड धनशक्ती विरोधात ही निवडणूक आम्ही लढवली आणि यश मिळवल्याचं त्यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी सुद्धा एक संदेश दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र, तो यशस्वी झाला नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार केल्याचा विशेष उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यावेळी यांनी बोलताना केला.
नाना पटोलेंच्या अनुपस्थितीती
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, असं बोलले जात असतानाच बैठकीला उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे म्हटले आहे.