राज ठाकरे यांनी शरद पवारांकडून काही तरी शिकले पाहिजे - ब्रीजभूषण सिंह

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज ठाकरे यांनी शरद पवारांकडून काही तरी शिकले पाहिजे - ब्रीजभूषण सिंह

मुंबई, दि. 24 मे - मनसेचे नेते सचिन मोरे यांनी ब्रीजभूषण सिंह यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. या फोटोला कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है, असे कॅप्शन मोरे यांनी दिले. यावर आता ब्रीजभूषण सिंह यांनी शरद पवारांचे कौतुक करत मनसेला प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक असून याचा मला अभिमान आहे. आजही शरद पवार अयोध्येत आले, तर मी त्यांचे स्वागत करणार, राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून काही तरी शिकले पाहिजे, असा सल्लाही ब्रीजभूषण सिंह यांनी दिला.

मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि शरद पवार हे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संरक्षक आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी पुण्यात झाला होता. यावेळी मी प्रामुख्याने उपस्थित होतो. कुठलाही कार्यक्रम झाला तरी पवार पहिल्यांदा माझा सत्कार करायचे, मी कुस्ती क्षेत्रात चांगले काम केले. यासाठी पवारांनीही माझे कौतुक केले आहे. सुशील कुमारचे ऑलिम्पिक मेडल असो किंवा योगेश्वर दत्त यांची कामगिरी, यामध्ये आमचा मोठा वाटा आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान मोरे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्रीजभूषण सिंह यांच्यासह शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे दिसत आहे. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचे दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असे या फोटोतील बॅनरवर लिहिले आहे.