का चर्चेत आहे रोहित पाटील यांची 'ती' भावनिक साद?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

का चर्चेत आहे रोहित पाटील यांची 'ती' भावनिक साद?
सांगली-
कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या सांगता सभेत रोहित आर. आर. पाटील म्हणालेकी,  '19 जानेवारीला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.’ या वक्तव्याद्वारे रोहित पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली असून या वाक्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. 

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे सध्या कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. शेवटच्या प्रचारसभेत ते म्हणाले, ‘आज मी जे पॅनल निवडलंय, त्यावर सर्वसामान्य लोक म्हणतातय की, तुम्ही आमच्या मनातील पॅनल निवडलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलं आहे. पक्षाची जबाबदारी सर्वसामान्यांनी घेतली आहे. 19 जानेवारी रोजी याचा निकाल लागल्यानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ‘

पुढच्या 25 वर्षांचं व्हिजन आमच्याकडे 
रोहित पाटील म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाकडे पुढील 25 वर्षे सांगली कसे असेल, याचं व्हिजन तयार आहे. सध्या कोणती कामं सुरु आहेत, कोणती केली पाहिजेत, याची सर्व माहिती मला आहे. आपल्या कार्यकर्त्याचा, सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, हीच आमची भावना आहे. पंधरा वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती, नगरपंचायत होती, तेच लोक आज पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे म्हणतायत. मग एवढे दिवस यांनी काय केलं? मी इथल्या प्रत्येक वॉर्डात फिरलो, त्यामुळे इथले वास्तव मला माहिती आहे, असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले.