भारत आणि द. आफ्रिकेचा पहिला सामना होणार प्रेक्षकांशिवाय !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारत आणि द. आफ्रिकेचा पहिला सामना होणार प्रेक्षकांशिवाय !
जोहान्सबर्ग -
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना येत्या 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिला कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाईल अशी माहिती मिळत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड तिकिटांची विक्री करायला तयार नसल्याचे वृत्त आहे. 

काही पदाधिकारी आणि दोन हजार चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून हा लाईव्ह सामना पाहता येईल, असे वृत्त ‘रॅपपोर्ट’ या दक्षिण आफ्रिकन वर्तमानपत्राने दिले आहे. ओमायक्रॉनची बाधा झालेले अनेक रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळले आहेत. या नव्या व्हेरिंएटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत.

पुढच्या आठवड्यात सरकार नियमांमध्ये काही बदल करणार का? त्याकडे बोर्डाचे लक्ष लागले आहे. वँडर्सवर तीन जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. पण त्याची तिकीट विक्री अजून सुरु झालेली नाही.

मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळले होते. ओमायक्रॉन डेल्टापेक्षा घातक व्हेरिएंट असून त्याचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोविडचे नवीन रुग्ण वाढत असताना भारताचा हा दौरा होत आहे. अलीकडेच कोरोनामुळे वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा स्थगित झाला आहे. विडिंज खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. काल अ‍ॅशेस मालिकेतही कोरोनाने एंट्री केली. ब्रॉडकास्टिंग टीममधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली.

ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे या दौऱ्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. पण दोन्ही देशाच्या बोर्डांनी मालिका खेळवण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत खेळणाऱ्या क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी बायोबबलची व्यवस्था करण्यात आली आहे. 16 डिसेंबरला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला, टीम इंडिया एका रिसॉर्टमध्ये थांबली आहे. हा संपूर्ण रिसॉर्ट क्रिकेट साऊथ आफ्रिकेने भारतीय संघासाठी बुक केला आहे. 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.