एके काळी आत्महत्या करायला निघाला होता कुलदीप यादव; 'चायनामन' म्हणून टीम इंडियात आज ओळख 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एके काळी आत्महत्या करायला निघाला होता कुलदीप यादव; 'चायनामन' म्हणून टीम इंडियात आज ओळख 
नवी दिल्ली - 
टीम इंडियाचा खेळाडू कुलदीप यादव आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 14 डिसेंबर 1994 कानपूरमध्ये झाला होता. सध्या कुलदीप यादवचा फॉर्म चांगला नसला तरी बऱ्याचदा अनेक बॅटसमन त्याला घाबरतात. कुलदीप यादवला गेल्या काही काळापासून टीम इंडियामध्ये कधी संधी मिळते तर कधी मिळत नाही. कुलदीप यादवची चायनामन म्हणून ओळख आहे. कुलदीप यादवनं एकदा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, असं एका मुलाखतीत सांगितलं होतं. काय घडलं होतं नेमकं, जाणून घेऊया. 

कुलदीप यादव त्यावेळी 13 वर्षांचा होता. उत्तर प्रदेश राज्याच्या टीममध्ये अंडर 15 च्या टीममध्ये सिलेक्शन न झाल्यानं आत्महत्येचा त्यानं केला होता. कुलदीप यादव निराश झाला होता. तो अधिक निराश झाला होता त्यानं क्रिकेट देखील सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कठोर परिश्रमामुळं ते चित्र बदललं आणि तो टीम इंडियापर्यंत पोहोचला.

देशांतर्गत सामन्यामध्ये खेळणारा कुलदीप कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रिकेट खेळत होता. कोलकाता नाईट रायरडर्सकडून खेळताना कुलदीप यादवनं चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळं त्याला टीम इंडियाचं दार उघडलं. 2014 मध्ये आयसीसी अंडर 19 मध्ये त्यानं हॅट्रिक केली. कुलदीप यादव भूवनेश्वर कुमार नंतर टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये 5 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

कुलदीप यादव 18 डिसेंबर 2019 रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. कुलदीप यादवनं 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 7 कसोटी सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. 65 वनडेमध्ये 107 विकेटतर 23 टी-20 मध्ये 41 विकेट घेतल्या आङेत. जुलै 2021 नंतर त्यानं आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नाही.