मुंबईकर एजाज पटेलने 10 विकेट घेत इतिहास रचला, जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव !

मुंबईकर एजाज पटेलने 10 विकेट घेत इतिहास रचला, जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव !

मुंबई - 

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेत इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडमधील पहिला गोलंदाज ठरला आहे. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने सर्वप्रथम शुभमन गिलला आपला शिकार बनवले. यानंतर त्याच षटकात त्याने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईत जन्मलेल्या 33 वर्षीय इजाजने एकाही भारतीय खेळाडूला आपल्यासमोर टिकू दिले नाही आणि प्रत्येकाला एक-एक करून आपला बळी बनवले.

एजाजच्या या कामगिरीवर जगभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानविरुद्ध एका डावात 10 विकेट घेणारा भारतीय दिग्गज अनिल कुंबळेनेही त्याचे अभिनंदन केले.