चालत्या दुचाकीवर सूर्यनमस्कार करणाऱ्या रोहित शिंदेची इंडिया व एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद (व्हिडिओ)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चालत्या दुचाकीवर सूर्यनमस्कार करणाऱ्या रोहित शिंदेची इंडिया व एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद (व्हिडिओ)

बारामती, (प्रबोधन न्यूज) - 14 जानेवारी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त चालू मोटारसायकलवर 20 सेकंदामध्ये सूर्यनमस्कार घातले, म्हणून रोहित दिलीप शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. मोटार सायकलवर 10 वेळा सूर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला तो मोटार सायकल रायडर आहे. तो बारामतीचा रहिवासी आहे.

रोहित वयाच्या 16 वर्षापासून मोटार सायकल रेस करीत आलेला आहे. गेल्या 12 वर्षापासून मोटार सायकल रायडींग करून आतापर्यंत 300 हून अधिक मोटार सायकल रायडिंग शोमध्ये तो सहभागी झाला आहे. मोटार सायकल रायडींग करणे हा स्वत:पुरता मर्यादीत राहिलेला नसून त्याने अनेक इच्छुक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण सुरुवात केल्याची माहिती त्याने दिली आहे.

चालत्या मोटारसायकलवर चार मिनिट आणि वीस सेकंदांमध्ये दहा सूर्यनमस्कार बारामतीच्या रोहित शिंदे या युवकाने घातले आहेत. त्याच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.  मोटारसायकलवर दहा वेळा सूर्यनमस्कार घालणारा तो जगातील पहिला मोटारसायकलस्वार ठरला आहे.

मोटारसायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. केटीएम कंपनीच्या आरसी तीनशे नव्वद सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणाऱ्या ट्रॅक रेसिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी रोहितची निवड झालेली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणार्‍यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे असे बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=kuTcTR52VPw