सहा स्केटिंग डांसर्सचा निवड झाल्याबद्दल द मिरेकल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सत्कार

सहा स्केटिंग डांसर्सचा निवड झाल्याबद्दल द मिरेकल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सत्कार
सहा स्केटिंग डांसर्सचा निवड झाल्याबद्दल द मिरेकल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सत्कार

पुणे, दि. 23 मे - शनिवार दि. 21 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता पुण्याच्या 6 डान्स स्केट स्पोर्ट खेळाडूंचा आशियाई  स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेकरिता निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार समारंभ "द मिरेकल चॅरिटेबल ट्रस्ट" च्या वतीने वाय.एम.सी.ए. रास्ता पेठ या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास डांस स्केट स्पोर्ट असोसिएशन पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवडचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

नेपाळ येथे दि. 30 मे 2022 ते 3 जून 2022 रोजी आशियाई  स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातर्फे पुण्याच्या 6 खेळाडू ह्या डान्स स्केट स्पोर्ट एशियन चैम्पीयनशीप मधे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहोत. त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता व त्यांना प्रोत्साहीत करण्याकरीता त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

निवड झालेल्या खेलाडू पुढील प्रमाणे

  1. मिशेल मार्क भस्मे 22 वयोगटातील
  2. पलक अगरवाल 20 वयोगटातील
  3. सिमरन किराले 16 वयोगटातील
  4. स्म्रिती मल्लिक 18 वयोगटातील
  5. आदिती पान्डेय 16 वयोगटातील
  6. माही मेहता 14 वयोगटातील

वरील खेळाडूंचा सत्कार करण्याकरिता व शुभेच्छा देण्यासाठी   पुण्याचे विविध क्षेत्रातील मान्यवर श्री. प्रशांत जगताप (पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) श्री. धनंजय विष्णू जाधव (प्रवक्ते व उपाध्यक्ष भाजपा, पुणे शहर), श्री. संजय शेंडगे (नगरसेवक, पिंपरी चिंचवड, भाजपा), श्री. राजन नायर (सरचिटणीस  वंचित बहुजन आघाडी. पिंपरी चिंचवड), श्री. प्रविण मेकँजी (जनरल सेक्रेटरी वाई एम सी ए, पुणे), मिलिंद मधुसूदन क्षीरसागर (उपाध्यक्ष  डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन, पुणे),  श्री. किरण पाटोळे (सी ई ओ पिंपरी चिंचवड सह्कारी बँक) अणि श्री. माईकल साठे (अध्यक्ष अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे) यांनी उपस्थिती दर्शविली. डांस स्केट स्पोर्ट कार्यकारिणीचे श्री मार्क भस्मे सर, श्री संजय कांबळे सर, श्री रविंद्र साठे सर, सौ श्रुती क्लारंस यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच श्री रोशन शेट्टी, श्री जयंत देशपांडे सर, श्री दिपक चव्हाण सर, श्री सुरेश दरवडे सर हे संघटनेचे सभासद उपस्थित होते.