दातांचा पिवळेपणा दूर करण्याचे चार सोपे घरगुती उपाय ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दातांचा पिवळेपणा दूर करण्याचे चार सोपे घरगुती उपाय ! 
मुंबई - 

निरोगी दात आणि हिरड्यांमुळे आपलं हसणं मनमोहक बनतं तर पिवळ्या दातांमुळे आपल्याला लाज वाटते. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लोक अनेक महागडे उपाय करून पाहत असले तरी जास्त फरक पडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असेच काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे दातांचा पिवळेपणा तर दूर होईलच पण ते निरोगी आणि मजबूत देखील होतील. 

* ऑइल पुलिंग 
सूर्यफूल, तीळ किंवा नारळाच्या तेलांमध्ये लॉरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे बॅक्टेरिया नष्ट करते आणि पिवळेपणा दूर करते. यासाठी तोंडात या तेलाचे काही थेम्ब टाकून गार्गल करा. असे नियमित केल्याने दातांचा पिवळेपणा निघून जाईल.

* बेकिंग सोड्याने ब्रश
एक चमचा बेकिंग सोडा २ चमचे पाण्यात मिसळून दात घासावेत. असे आठवड्यातून २-३ वेळा केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.

* केळीचे साल घासा 
केळीचे साल नियमितपणे 5-7 मिनिटे दातांवर चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. असे नियमित केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होऊन ते निरोगीही राहतील.

* हायड्रोजन पेरोक्साइड
हायड्रोजन पेरॉक्साइड हे एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जे तोंडातील बॅक्टेरिया मारते आणि पिवळसरपणा देखील काढून टाकते. यामध्ये बेकिंग सोडा मिसळून तुम्ही ब्रश करू शकता. 

* हिरड्या आणि दातांचे आजार टाळण्यासाठी टिप्स:
. फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने दिवसातून दोनदा दात घासा आणि नियमित फ्लॉस करा. 
. दातांच्या तपासणी आणि साफसफाईसाठी नियमितपणे दंतवैद्याला भेट द्या.
. चांगला संतुलित आहार घ्या.
. धूम्रपान सोडा कारण यामुळे हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो.

* दात आणि हिरड्या कसे स्वच्छ करावे?
. दात घासण्याचा आणि फ्लॉस करण्याचा एक योग्य मार्ग आहे. यासाठी मऊ ब्रिस्टल्ड ब्रश आणि फ्लोराईड टूथपेस्टने सर्व बाजूंनी हळूवारपणे दात घासावेत. तसेच दर ३ ते ४ महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदलावा.
.  त्याच वेळी, तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी हलका ब्रश वापरा.
.  डेंटल फ्लॉस, प्रीथ्रेडेड फ्लॉसर, वॉटर फ्लॉसरने दात स्वच्छ करा. हे दातांमध्ये अडकलेले अन्न काढून टाकते, जिथे टूथब्रश देखील पोहोचू शकत नाही. फ्लॉस नंतर खळखळून चूळ भरा.