मुंबई -
आपला बहुतांश वेळ लॅपटॉप किंवा मोबाईल समोर खर्च होतो. म्हणून सध्या डोळ्यांच्या समस्या सातत्याने वाढताना दिसतात. जर आपण डोळ्यांची विशेष काळजी घेतली नाही, तर दृष्टी कमजोर होते. मोबाईल किंवा लॅपटॉपमधून निघणाऱ्या लाटा डोळ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवतात. त्याचबरोबर, दृष्टीही हळूहळू कमी होऊ लागते. जर आपण बदलत्या जीवनशैलीमध्ये काही बदल आणले नाही आपले नुकसान होऊ शकते. म्हणूनच असे म्हटले जाते की दररोज सकाळी व्यायाम करणे, ताज्या हवेत फिरून येणे खूप महत्वाचे आहे. मात्र याबरोबरच आपला आहारदेखील असा असावा की जो आपल्याला पोषणाबरोबरच तंदुरुस्तही ठेवेल. चला तर मग, जाणून घेऊया अशा भाज्यांबद्दल ज्यांच्या सेवनाने आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.
० टोमॅटो
डोळ्यांसाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये 'व्हिटॅमिन सी' मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सीचे सेवन दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि कॉपर देखील मुबलक प्रमाणात आढळतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूप चांगले आहे. आपण अनेक प्रकारे टोमॅटोचे सेवन करू शकता. जसे की त्याची चटणी, टोमॅटोचा ज्यूस तसेच भाजीच्या स्वरूपात वापरता येतो.
० गाजर
दृष्टी तेज ठेवण्यासाठी गाजर फायदेशीर आहे. गाजरामध्ये अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. जे दृष्टी प्रखर ठेवते. त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. यासह फायबर, व्हिटॅमिन के मध्ये देखील समृद्ध आहे. आपण गाजराचे विविध प्रकारे सेवन करू शकता. उदाहरणार्थ, सॅलड, भाजी, हलवा. याशिवाय त्याचा ज्यूस देखील रोज घेता येतो.
० पालक
पालकाचे सेवन केवळ डोळ्यांसाठी चांगले नाही तर हिमोग्लोबिन वाढवते. हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. दृष्टी तेज ठेवण्यासाठी रोज पालक खाणे फायदेशीर आहे. आपण पालक अनेक प्रकारे वापरू शकता. पालक डाळ, पालक पनीर तसेच पालकाचा ज्यूस आपल्या रोजच्या आहारात घेतल्यास दृष्टी सुधारण्यासह तुमच्या आरोग्यालाही फायदा होईल.
० ब्रोकोली
ब्रोकोली सल्फोराफेनने समृद्ध आहे आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि मॅंगनीजमध्ये देखील समृद्ध आहे. दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही ब्रोकोलीचे सेवन करू शकता. ब्रोकोली डोळ्यांसाठी खूप चांगली आहे. आपण भाजी म्हणून तसेच ज्यूस म्हणूनही आहारात ब्रोकोली समाविष्ट करू शकता.
० आवळा
आवळा अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे डोळ्यांमधील रेटिना निरोगी ठेवण्याचे काम करते. दुसरीकडे, आवळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन आढळते, जे फ्री रॅडिकल्स रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. आवळ्याचे सेवन डोळ्यांसाठी खूप चांगले आहे. आपण त्याचा अनेक प्रकारे वापर करू शकता जसे की लोणचे, मुरंबा, ज्यूस, कँडी इ.