नेहरू नगरच्या  कोंडवाड्यात मुक्या जीवांवर अमानुषतेची परिसीमा !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नेहरू नगरच्या  कोंडवाड्यात मुक्या जीवांवर अमानुषतेची परिसीमा !
माजी महापौर योगेश बहेल यांचा आरोप 
पिंपरी - 

एका वाहनात १७-१८ श्वान पकडून त्यांना कोंबून ठेवणे, कोंडवाड्यात त्यांच्यावर अपुऱ्या साधनसामुग्रीच्या सहाय्याने नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, ऑपरेशन टेबलाऐवजी सिमेंटच्या ब्लॉकवर प्राण्यांना झोपवणे, छतावरील फॅनला सलाईन लावणे, या आणि अशा अनेक गैरसुविधांना तोंड देत अक्षरशः जिवंत असतानाच मरणयातना सोसणाऱ्या श्वानांवर नेहरू नगरच्या कोंडवाड्यात अमानुषतेची परिसीमा गाठली जात असून श्वानांवरील नसबंदीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी केला आहे.
भ्रष्ट ठेकेदारांनी आणि सत्ताधारी भाजपने श्वानांनाही सोडले नसल्याचा अत्यंत गंभीर आरोप होत असल्याने . या प्रकारावर प्राणीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील भटक्‍या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाते. नेहरूनगर येथील कोंडवाड्यामध्ये कुत्र्यांना नेऊन त्यांची शस्त्रक्रिया केली जाते. महापालिकेच्या वतीने कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी चार संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये जीवरक्षक ऍनिमल वेल्फेअर, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुईल्टी फॉर ऍनिमल, ऍनिमल व्हेल्फेअर व जामिस स्मिथ ट्रस्ट या संस्थांचा समावेश आहे. या संस्थाची मुदत 15 नोव्हेंबरला संपली. त्यामुळे या कोंडवाड्यात सद्यस्थितीला शस्त्रक्रिया करण्यासाठी एकही प्राणी नाही. मात्र तेथे पाहणी केली असता तेथील असुविधांची बजबजपुरी माजल्याचे दिसते. 
शहरातील भटक्‍या कुत्र्यांना पकडून आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका वाहनामध्ये चार कर्मचारी 17 ते 18 कुत्र्यांना पकडून आणतात. त्यानंतर त्यांना कोंडवाड्यामध्ये ठेवले जाते. शस्त्रक्रिया करण्यासाठी असलेल्या ऑपरेशन थिअटरची दुरावस्था झाली आहे. याठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या साधनांचा तुटवडा आहे. कुत्र्यांना सिमेंटच्या ब्लॉकवर ठेवून अमानुषपणे त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या टेबलची व्यवस्थाही याठिकाणी करण्यात आली नाही. शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेक प्राण्यांना सलाईन लावावे लागते त्यासाठी सुविधा नसल्याने छताला असलेल्या फॅनला सलाईन लावले जात असल्याचा धक्कादायक खुलासा येथील कर्मचाऱ्यांनी केला. महापालिकेच्या वतीने कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे प्राण्यांना मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
याठिकाणी प्राण्यांवर उपचार केल्यानंतर येथील बायोमेडिकल कचरा पोत्यामध्ये भरून तसाच ठेवला जातो. तसेच इतर कचरा प्राण्यांच्या पिंजऱ्यामागे फेकला जातो. परिसराची सफाई वेळेमध्ये होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तर येथील कर्मचारी कामाच्या वेळेस मद्यपान करत असल्याचे धक्कादायक वास्तव देखील येथे असलेल्या मद्याच्या बाटल्यांवरून समोर आले आहे.

भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी - योगेश बहल 
कोंडवाड्यातील श्वानांच्या नसबंदीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नगरसेवक योगेश बहल यांनी केली. मी महासभेमध्ये आरोप करण्यापूर्वी याठिकाणी पाहणी केली होती. येथील ऑपरेशन थिअटरची अवस्था दयनीय आहे. बायोमेडिकल कचरा कुठेही टाकला आहे. याठिकाणी नसबंदी करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा नाही. याठिकाणी शंभर केज बांधण्यात आले आहेत. म्हणजेच दिवसभरात फक्त शंभर कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होऊ शकते. असे असताना तीन महिन्यामध्ये 7,125 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असल्याचे दाखविण्यात आले आहे. आयुक्तांनी याची चौकशी करावी, असे बहल म्हणाले. 

महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले की, सद्यस्थितीत ठेकेदारांची मुदत संपल्यामुळे त्यांचे काम बंद झाले आहे. यापुढे ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच या कामासाठी आता बजाज संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ते निःशुल्क काम करणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या पैशांची बचत होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे.

नेहरू नगरच्या कोंडवाड्यात दिवसाला 17 ते 18 कुत्री पकडून आणली जातात. काही प्राण्यांना दुखापत असेल तर त्यांची शस्त्रक्रिया केली जात नाही. दिवसाला 15 सर्जरी होतात. सर्जरी झाल्यावर चार दिवस कुत्र्यांना ठेवले जाते. याठिकाणी आम्ही 2019 पासून काम करत आहोत, मात्र अद्याप आम्हाला पीएफ कार्ड नाही, अशी तक्रार कोंडवाड्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.