पिंपरी येथे सर्व धर्मियांनी साजरी केली इफ्तार पार्टी

पिंपरी येथे सर्व धर्मियांनी साजरी केली इफ्तार पार्टी
पिंपरी येथे सर्व धर्मियांनी साजरी केली इफ्तार पार्टी
पिंपरी येथे सर्व धर्मियांनी साजरी केली इफ्तार पार्टी
पिंपरी येथे सर्व धर्मियांनी साजरी केली इफ्तार पार्टी

पिंपरी-चिंचवड, दि. २५ एप्रिल -  भारताच्या संविधानात उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम नगर येथील अभिजित साळुंखे आणि जुबेर खान यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

यावेळी मोठ्या संख्येने हिंदू, मुस्लिम, ख्रिचन, बौध्द धर्मीय उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक सद्गुरू कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी आर. जे. गायकवाड, आझम पानसरे, शकुर्ला पठाण, मीनाज मोगल, समीर शेख, अल्ताफ शेख, मोमीन मुश्ताक, अकबर चौधरी, मोबीन बादशहा, वाहीद पठाण, अबु शेख, शकिल शेख, बख्तियार खान, रियाझ मोगल, यासिन गोलंदाज, आनंद पवार, सुनिल कांबळे, कैलास साळुंखे, विजय गायकवाड, प्रभुदास तायडे, विजय महापाडी, सर्जेराव ऊर्फ बाळासाहेब  जगताप, सॅम्युअल डिसुझा, लक्ष्मण रुपनर, दत्तात्रय धाडगे, सागर पवार, वंचित आघाडीचे देवेंद्र तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी सद्गुरू कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. इफ्तार झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला. वेग-वेगळ्या प्रकारची फळे, खजूर, सामोसा, कोल्ड्रीक्स यांचा पार्टीत समावेश होता.