नेहरू नगरच्या कोंडवाड्यात मुक्या जीवांवर अमानुषतेची परिसीमा !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
एका वाहनात १७-१८ श्वान पकडून त्यांना कोंबून ठेवणे, कोंडवाड्यात त्यांच्यावर अपुऱ्या साधनसामुग्रीच्या सहाय्याने नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, ऑपरेशन टेबलाऐवजी सिमेंटच्या ब्लॉकवर प्राण्यांना झोपवणे, छतावरील फॅनला सलाईन लावणे, या आणि अशा अनेक गैरसुविधांना तोंड देत अक्षरशः जिवंत असतानाच मरणयातना सोसणाऱ्या श्वानांवर नेहरू नगरच्या कोंडवाड्यात अमानुषतेची परिसीमा गाठली जात आहे. भरीस भर म्हणून श्वानांवरील नसबंदीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी महापालिकेतील भ्रष्ट ठेकेदारांनी श्वानांनाही सोडले नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकारावर प्राणीप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी - योगेश बहल
कोंडवाड्यातील श्वानांच्या नसबंदीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नगरसेवक योगेश बहल यांनी केली. मी महासभेमध्ये आरोप करण्यापूर्वी याठिकाणी पाहणी केली होती. येथील ऑपरेशन थिअटरची अवस्था दयनीय आहे. बायोमेडिकल कचरा कुठेही टाकला आहे. याठिकाणी नसबंदी करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा नाही. याठिकाणी शंभर केज बांधण्यात आले आहेत. म्हणजेच दिवसभरात फक्त शंभर कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होऊ शकते. असे असताना तीन महिन्यामध्ये 7,125 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असल्याचे दाखविण्यात आले आहे. आयुक्तांनी याची चौकशी करावी, असे बहल म्हणाले.
महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले की, सद्यस्थितीत ठेकेदारांची मुदत संपल्यामुळे त्यांचे काम बंद झाले आहे. यापुढे ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच या कामासाठी आता बजाज संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ते निःशुल्क काम करणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या पैशांची बचत होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे.
नेहरू नगरच्या कोंडवाड्यात दिवसाला 17 ते 18 कुत्री पकडून आणली जातात. काही प्राण्यांना दुखापत असेल तर त्यांची शस्त्रक्रिया केली जात नाही. दिवसाला 15 सर्जरी होतात. सर्जरी झाल्यावर चार दिवस कुत्र्यांना ठेवले जाते. याठिकाणी आम्ही 2019 पासून काम करत आहोत, मात्र अद्याप आम्हाला पीएफ कार्ड नाही, अशी तक्रार कोंडवाड्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.