पांडुरंगा, विठ्ठला, मायबापा तुझ्या चरणी आमची सेवा फलश्रुत होण्याची संधी मिळाली - अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पांडुरंगा, विठ्ठला, मायबापा तुझ्या चरणी आमची सेवा फलश्रुत होण्याची संधी मिळाली - अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

पुणे, (प्रबोधन न्यूज) –

साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा

जय जय रामकृष्ण हरी.... जय जय रामकृष्ण हरी

पुण्यनगरीतील नागरिकांना जय हरी...आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे मुक्कामी दाखल होत आहे.  खरं तर कोरोनामुळे  मागील दोन वर्षांपासून वारकऱ्याच्या सेवेचा खंड हुरहुर भासविणारा होता. यंदा मात्र, माउलींसह तुकोबांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष...टाळ-मृदंगाचा निनाद...अखंड भजनाचा निनाद ऐकण्यासाठी आतुर झालो आहे.

जय जय राम कृष्ण हरी नामघोषात श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने निघालेले लाखो वारकरी म्हणजेच उर्जास्त्रोत आहेत. उन-वारा-पावसाची तमा न बाळगता भगवंताच्या नामात मंत्रमुग्ध वारकऱ्यांची भक्ती निष्ठेचे प्रतिक आहे. सुमारे साडेसातशे वर्षांपासून सुरू झालेला पालखी सोहळा हे जगातील विलोभणीय चित्र आहे. पसायदानातून समस्त मानवजातीसाठी करूणा भाकणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि  आपल्या अभंगातून जाती-धर्मासह कर्मकांडावर सडवूâन टीका करणारे जगतगुरू संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत चोखोबा, संत सावता, संत निवृत्ती, संत एकनाथ महाराजांची शिकवणूक आधुनिकेची कास धरणारी आहे.

वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी लाखो नागरिक आप आपल्या परीने मदतकार्य करीत असतात. अशाच पद्धतीने आम्हीही वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रण केला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून खंडित वारीसेवेचा आनंद मिळविण्यासाठी सज्ज झालो आहे. पुण्यनगरीत येणाऱ्या वारकऱ्यांची तन मनाने सेवा करण्यासाठी आतुर झालेलो आहे. पांडुरंगा विठ्ठला मायबापा तुझ्या चरणी आमची सेवा फलशृष होण्याची संधी मिळाल्याचे भाग्य समजतो. माउलींचा आशार्वाद कायम  नागरिकांना मिळो, हीच प्राथर्ना करतो....पुन्हा एकदा सर्व वारकऱ्याचे पुणे पोलिसांकडून मनःपूर्व स्वागत करतो. जय हरी माउली...

- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त