भाजप नेते माझ्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या प्रयत्नात! - भास्कर जाधव 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजप नेते माझ्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या प्रयत्नात! - भास्कर जाधव 

मुंबई -

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळे मी त्यांच्या रडारवर आहे. माझ्या विरोधात हक्कभंग आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी त्याला उत्तर देईन, असं  शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी माफी मागावी नाहीतर त्यांचं निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सुरुवातीला कडक भूमिका घेणाऱ्या भास्कर जाधवांनी नंतर बिनशर्त माफी मागत असल्याचं सांगत विषयावर पडदा टाकला. मात्र, 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळेच मी भाजपच्या रडारवर असल्याची टीका जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केलीय.

भास्कर जाधवांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. सभागृहात भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशा घोषणा सुरु झाल्या. ‘सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल सहन केली जाणार नाही. ‘ अंगविक्षेप करतायत ते सहन केलं जाणार आहे का, ही पद्धत आहे का सभागृहाची? अंगविक्षेप करून भास्कर जाधव जे बोलतायत हे शोभनीय नाही. हे चालत नाही. आम्ही यांच्या नेत्यांचीही अशाच प्रकारे नक्कल केली. हे चालेल का सभागृहाला? त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक मागणी फडणवीसांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे ते म्हणाले.