माजी पंतप्रधान देवेगौडांचा हात हातात घेऊन पंतप्रधान मोदींच्या अनौपचारिक गप्पा !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

माजी पंतप्रधान देवेगौडांचा हात हातात घेऊन पंतप्रधान मोदींच्या अनौपचारिक गप्पा !
नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारताचे माजी पंतप्रधान आणि राज्यसभा खासदार एच डी देवेगौडा यांची संसदेत भेट घेतली. 'आज संसदेत आपले माजी पंतप्रधान श्री. देवेगौडा जी यांच्याशी ग्रेट भेट झाली,' असे ट्विट करीत पंतप्रधान मोदींनी फोटो शेअर केले. दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट झाल्याचे या फोटोंवरून जाणवते. मोदी आणि देवेगौडांची अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे ही समजते. फोटोमध्ये दिसते की पंतप्रधान मोदी देवेगौडांना खुर्चीवर बसण्यासाठी आमंत्रित करत आहेत. दोन्ही नेते एकमेकांचा हात धरून चांगल्या गप्पा मारत वेळ घालवताना दिसून येत आहे. 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ही भेट झाली. 29 नोव्हेंबरपासून दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान, ट्विटरवर लोकांनी खासदार देवेगौडा यांच्या भेटीच्या वेळेचे पंतप्रधान मोदींचे हावभाव, आदरयुक्त वागणूक आणि देहबोलीचे कौतुक केले. एच. डी. देवगौडा हे जून 1996 ते एप्रिल 1997 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. सध्या ते कर्नाटकमधून राज्यसभेवर खासदार आहेत. ते जनता दल (सेक्युसर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत.

देवेगौडा यांनी भारतात लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. नंतर ते 1994 मध्ये जनता दलात सामील झाले, जे नंतर भारतीय जनता पक्ष बनले. कर्नाटकात जनता दलाला बळ देणारे ते प्रमुख व्यक्ती होते. 1999 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा काही नेते भाजपमध्ये सामील झाले, जे कर्नाटकातील काही नेते देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) मध्ये सामील झाले. त्यामुळे जरी आता ते एकत्र नसतील, पण देवेगौडा आणि नरेंद्र मोदी यांचे जनता दलापासूनचे जुने संबंध आहेत आणि ते संबंध अजूनही शाबूत आहेत, हेच या फोटोंवरून जाणवते.