'हे आमच्या घरातल्या मुलीचं लग्न !' डान्स व्हिडीओवरुन होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचे खरमरीत उत्तर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'हे आमच्या घरातल्या मुलीचं लग्न !' डान्स व्हिडीओवरुन होणाऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचे खरमरीत उत्तर
मुंबई -
 
'तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. अगदी आम्ही 50 लोकही एकत्र नव्हतो. आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. आम्ही सदानंद, मिसेस राऊत, मुलं असे सगळे त्या कार्यक्रमात होते. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांसोबत डान्सच्या व्हिडीओवरुन होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुळे बोलत होत्या.     
खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचा विवाह सोहळा सोमवारी मुंबईत पार पडला. या लग्न समारंभापूर्वी हळद, मेहंदी आणि संगिताचाही जंगी कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी एका बॉलिवूडमधील गाण्यावर जोरदार डान्सही केला. मात्र राऊत आणि सुळे यांचा डान्सचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अशावेळी विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सुळे आणि राऊत यांच्यावर या डान्सवरुन जोरदार टीकाही करण्यात येतेय. या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले.  या विवाह सोहळ्याला स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.

दरम्यान, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी केला होता.