सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकाला मुदतवाढ

सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकाला मुदतवाढ
मुंबई -
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीदरम्यान अमरावती जिल्हयामध्ये संचारबंदी व इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना अडचणी निर्माण झालेल्या होत्या. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी दिली आहे. एम.आर्च, एमसीए, एम.फार्मसी, एम.ई. एम.टेक, बी. आर्च, डीएसई, डीएसपी, बी.एचएमसीटी, बी.ई. बी.टेक, बी.फार्मसी, एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महा सीईटी सेलच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने आर्किटेक्चर विभागातील खालील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येत आहे. मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.