कोरोनामृतांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींची संख्या तात्काळ वाढवा- नगरसेवक अभिषेक बारणे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कोरोनामृतांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमींची संख्या तात्काळ वाढवा- नगरसेवक अभिषेक बारणे

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सध्या परवानगी असलेल्या पाच स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातलगांना अनेक तास वाट पहावी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन शहरातील इतरही स्मशानभूमींमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची परवागी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अभिषेक बारणे यांनी केली आहे.

याबाबत अभिषेक बारणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, शहरामध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. शहरातील सांगवी, भोसरी, निगडी, पिंपरी व भाटनगर या ठिकाणी सध्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शहरात 70 हून अधिक स्मशानभूमी असताना केवळ पाच स्मशानभूमीमध्ये करोनामृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

त्यामुळे या पाचही स्मशानभूमीतील चित्र अत्यंत भयानक आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा-दहा तास मृताच्या नातेवाईकांना वाट पहावी लागत आहे. मृत्यूनंतरही देहाची होणारी अवहेलना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सर्व बाबींचा विचार करून शहरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या स्मशानभूमींमध्ये कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्काळ परवानगी देण्यात यावी, असेही या पत्रकात बारणे यांनी म्हटले आहे.